SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 968 पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 968 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff Selection Commission Recruitment For Junior Engineer Post , Number of Post Vacancy – 968 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ अभियंता (सिव्हिल )788
02.कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल )15
03.कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल )128
04.कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल )37
 एकुण पदांची संख्या968

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे सिव्हिल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल विषयांमध्ये इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : राज्य शासन सेवेतील गट क व ड संवर्गातील विविध पदांसाठी सरळसेवा पद्घतीने पदभरती..

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01.08.2024 रोजी कमाल वय हे 32 वर्षांपर्यंत तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 18 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment