Reserve Bank of India : भारतीय रिझर्व्ह बँकेत तब्बल 450 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Reserve Bank of India Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 450 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यामध्ये असिस्टंट ( सहाय्यक ) पदांच्या एकुण 450 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , प्रवर्गनिहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहे .
| प्रवर्ग | पदसंख्या |
| ST | 56 |
| SC | 45 |
| OBC | 71 |
| EWS | 37 |
| GEN | 241 |
| एकुण पदसंख्या | 450 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 50 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ( मागास प्रवर्ग / अपंग उमेदवारांकरीता उत्तम श्रेणी मध्ये उत्तीर्ण आवश्यक . ) तसेच संगणकावर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजी किमान वय हे 20 वर्षे तर कमाल 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/rbiaaaug23/ या संकेतस्थळावर दिनांक 04 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 450/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे , तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक / अपंग उमेदवारांकरीता 50/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !