स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 10 वी पात्रताधारकांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारकांकडून विहीत कालाधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Steel Authority Of Indai Limited Recruitment for Attendant Cum Technician post , Number of Post vacancy – 85 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये अटेंडंट कम टेक्निशियन ( ट्रेनी ) पदांच्या 85 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यापैकी खुला प्रवर्ग 35 जागा , अनुसुचित जाती 10 जागा , अनुसुचित जमाती 22 जागा , इतर मागास प्रवर्ग करीता 10 जागा तर आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग करीता 08 जागा अशा एकुण 85 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच इंटिग्रेटेड स्टील प्लांटमधून नियुक्त ट्रेडमध्ये किमान एक वर्ष कालावधची शिकाऊ प्रशिक्षण पुर्ण करणे आवश्यक असणार आहेत तसेच NAC आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://actappt.rrcecr.in या संकेतस्थळावर दिनांक 25 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 300/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक / अपंग प्रवर्गातील उमेदवारांकरतीा 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !