MPSC मध्ये प्रथमच 21,000 पदांसाठी महाभरती , MPSC मार्फत 2024 चे वेळापत्रक जाहीर !

Spread the love

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग मार्फत प्रथमच आगामी वर्षांमध्ये तब्बल 21,000 पदांसाठी पदभरती करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे . सदर पदांच्या पदभरती ह्या आगामी 8 महिन्यांत पुर्ण होणार आहेत . ज्यामुळे हजारे तरुणांचे शासन सेवेत नोकरी करण्याचे स्वप्न् पुर्ण होणार आहेत .

यांमध्ये राज्यातील गट अ , ब आणि अराजपत्रित ब संवर्गातील पदांसह गट क संवर्गातील लिपिक , कर सहाय्यक पदांकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . ही पदभरती प्रक्रिया आगामी वर्षातील आठ महिन्यांत पुर्ण करण्यात येणार आहेत .मागील पाच वर्षांचा आकडा काढल्यास , सन 2024 मधील MPSC पदभरतीचा आकडा हा सर्वात मोठा असणार आहे .

महाराष्ट्र लोकसेवा आयोगांकडून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2024 च्या संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले असून माहे मार्च महिन्यांपासून सदर पदभरती सुरुवात होणार आहेत .परीक्षेचे नाव संभाव्य परीक्षेचे दिनांक याबाबत सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपरीक्षेचे नावसंभाव्य दिनांक
01.दिवाणी न्यायाधीशदि.17 मार्च 2024
02.महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त परीक्षा 202416 जुन 2024
03.महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा29 सप्टेंबर 2024
04.सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक26 ऑक्टोंबर 2024
05.महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 202417 नोव्हेंबर 2024
06.महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा 202428 एप्रिल 2024
07.अन्‍न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा09 नोव्हेंबर 2024
08.महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 202410 नोव्हेंबर 2024
09.महाराष्ट्र कृषी सेवा मुख्‍य परीक्षा10 नोव्हेंबर 2024
10.महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा23 नोव्हेंबर 2024
11.महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्‍य परीक्षा 202423 नोव्हेंबर 2024
12.राज्य सेवा परीक्षा मुख्य परीक्षा14 डिसेंबर 2024
13.महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 202428 डिसेंबर 2024

हे पण वाचा : India Post : भारतीय डाक विभाग मध्ये तब्बल 1,899 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

अराजपत्रित गट ब आणि गट क संवर्गातील पदे : अराजपत्रित गट ब आणि गट क संवर्गामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी , राज्य कर निरीक्षक , पोलिस उपनिरीक्षक , दुय्यम निरीक्षक , कर सहाय्यक , उद्योग निरीक्षक , लिपीक टंकलेखक , तांत्रिक सहायक , सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांचा समावेश होतो .

परीक्षा निहाय अधिकृत्त सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

सविस्तर वेळापत्रक पाहा

Leave a Comment