दिवसेंदिवस व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने , विद्यार्थ्यांना त्या प्रमाणात वसतिगृहांची सुविधा उपलब्ध होत नसल्याने अशा गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला 60,000/- रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते .यासाठी पात्रता ,अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
पात्रता –
या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक आहे .इयत्ता दहावी / बारावीमध्ये 60 टक्के पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे . दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे .विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे .विद्यार्थ्याच्या पालकाचे मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000/- रुपयांपेक्षा कमी असावे .विद्यार्थी हा प्रवेश घेतलेली शेक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणचा स्थानिक नसावा .12 वी नंतर पदविका , पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा आणि पदवीनंतर पदव्युत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी हा दोन वर्षापेक्षा कमी नसावे .
शिष्यवृत्तीचे आर्थिक स्वरुप –
निवड झाल्याले विद्यार्थ्यास संबंधित अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो .शिष्यवृत्तीचे आर्थिक स्वरुप हे वास्तवाच्या ठिकाणानुसार ,बदल आहे .खर्चांची बाब व वास्तवाच्या ठिकाणानुसार शिष्यवृत्तीचे आर्थिक स्वरुप दर्शविणारा तक्ता पुढीलप्रमाणे आहे .

शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा .किंवा ऑनलाईन संकेतस्थळ https://mahaeschol.maharashtra.gov.in/ यावर क्लिक करा .
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !
- मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !