राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत .यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण निर्माण होत आहे .जिल्हा परिषदेच्या महीला व बाल विकास विभागामध्ये लिपिक व शिपाई पदांची 10,000 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत .या रिक्त जागांपैकी नुकतेच मुख्यमंत्र्यांने जाहीर केलेल्या महाभरतीमध्ये , बाल विकास विभागामध्ये , लिपिक व शिपाई पदांच्या 7,230 जागा भरण्यात येणार आहेत .
महिला व बाल विकास विभाग हे एक महत्वाचे विभाग असल्याने , कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे सदर विभागाच्या विकास कामकाजामध्ये मोठा अडथळा निर्माण होत आहे .काही रिक्त जागांवर सरकारमार्फत कंत्राटी / रोजंदारी पद्धतीने पदे भरली आहेत . आता या रिक्त जागांवर कंत्राटी पदे न भरता कायमस्वरुपी पद्धतीने पदे भरण्यात येणार आहेत .सरकारकडुन प्रामुख्याने लिपिक पदावर 11 महिने कालावधीकरीता कंत्राटी पद्धतीने पदे भरली आहेत .अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी अनेक कर्मचाऱ्यांचा कंत्राट कालावधी संपुष्टात येत असल्याने , सदर जागेवर राज्य सरकारकडुन कायमस्वरुपी पद्धतीने जागा भरण्यात येणार आहे .
लिपिक व शिपाई पदांच्या रिक्त जागांचे विवरण – महिला व बाल विकास विभागामध्ये लिपिक पदांचे एकुण 3,260 जागा रिक्त आहेत तर शिपाई पदांच्या एकुण 5,630 जागा रिक्त आहेत . सध्या शिपाईचे काही पदे बाह्य स्त्रोताद्वारे / कंपनीद्वारे आऊटसोर्सिंग पद्धतीने भरण्यात आले आहेत .परंतु कर्मचारी संघटनांची मागणी लक्षात घेता आता कंत्राटी / बाह्यस्त्रोताद्वारे पद न भरता कायमस्वरुपी पद्धतीने पदे भरण्यात येणार आहेत .
आवश्यक शैक्षणिक पात्रता – लिपिक पदांसाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ,त्याचबरोबर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि व मराठी 30 श.प्र.मि उत्तीर्ण आवश्यक आहे .आता राज्य सरकारच्या नविन नियमानुसार , लिपिक हे पद महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येईल . तर शिपाई पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही 4 थी पास असणे आवश्यक आहे , परंतु शिपाई पदाच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये वाढ करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन आहे .
या संदर्भातील महाभरती माहे नाव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु करण्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत . या निर्णयामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीची मोठी मिळणार आहे .
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !