जनसेवा नागरी सहकारी बँकेत अधिकारी ,लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

जनसेवा नागरी सहकारी क्रेडिट सोसायटी लि.कुंडल मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Janseva Urban Co-operative Credit Society Ltd. Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -20 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शाखाधिकारी05
02.लिपिक10
03.शिपाई05
 एकुण पदांची संख्या20

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01.साठी – सदर पदांकरीता उमेदवार हे एम.कॉम /बी.कॉम – बँकिंग / पतसंस्था क्षेत्रांमध्ये अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल .

हे पण वाचा : 12 वी पात्रता धारकांसाठी 3000+ जागेवर महाभरती , लगेच करा आवेदन !

पद क्र.02.साठी –  बी.कॉम , बँकिंग / पतसंस्था क्षेत्रांमध्ये अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल .

पद क्र.03 साठी – उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया –  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह , पासपोर्ट साईज फोटोसह जनसेवा अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.कुंडल मुख्य कार्यालय कुंडल ता.पलूस जि.सांगली या पत्यावर दिनांक 30.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment