राज्य शासन सेवेत कार्यरत सर्व शासकीय , जिल्हा परिषदा , इतर पात्र व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे . ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढ लागु करण्यात येणार आहे . या संदर्भाती अधिकृत्त निर्णय हिवाळी अधिवेशानामध्ये घेण्यात येणार आहे . डी.ए वाढ बाबतची अधिकृत्त बातमी पुढीलप्रमाणे पाहुयात ..
राज्यातील शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर डी.ए वाढ अद्याप पर्यंत मिळालेली नाही . यामुळे राज्यातीन अनेक कर्मचारी संघटनांनी निवेदने दिलेले आहेत . कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर राज्य सरकार देखिल सकारात्मक असल्याची बाब समोर आली असून , या मागणीबाबत अधिकृत्त निर्णय राज्याचे हिवाळी अधिवेशानामध्ये घेतला जाणार आहे .राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 टक्के महागाई भत्ता वाढीबाबत अधिकृत्त घोषणा करतील .सदरचा वाढील डी.ए हा केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे माहे जुलै 2022 पासुन थकबाकीसह लागु करण्यात येणार असल्याने , कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .
राज्य कर्मचाऱ्यांना सध्या जानेवारी 2022 पासुन 34 टक्के दराने महागाई भत्ता लागु आहे . 4 टक्के डी.ए वाढीनंतर राज्य कर्मचाऱ्यांना एकुण महागाई भत्ता हा 38 टक्के होणार आहे .सदरचा महागाई भत्ता वाढ राज्यातील निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना देखिल त्वरित लागु करण्यात येणार आहे .यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणारी डी.ए वाढीची मागणी अखेर पुर्ण होणार आहे .
- ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 140 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- लेखा व कोषागारे महाराष्ट्र अंतर्गत गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- लातुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत अधिकारी , हिशोबनीस , लिपिक , सेवक इ. पदांसाठी पदभरती !
- J&K Bank : जम्मू आणि काश्मीर बँक लि. अंतर्गत ( पुणे , मुंबई / बृहन्मुंबई येथे ) तब्बल 278 जागेसाठी पदभरती !