बिझनेस करायचा आहे, मग भांडवलाचा विचार करू नका ! अशा प्रकारे अर्ज करून शासन देत आहे कमी व्याजदरात कर्ज !

Spread the love

मित्रांनो प्रत्येकाला वाटत असती की आपल्या स्वतःचा व्यवसाय असावा, त्या व्यवसायातून आपण भरघोस नफा मिळवावा, पण व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे पाहिजे इतके भांडवल नसते. भांडवल कुठून मिळवायचे असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण होत असतो. त्यामुळे मित्रांनो जे कोणी नागरिक व्यवसाय करू इच्छिणार असतील त्यांच्यासाठी आज आम्ही महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. भांडवला संदर्भात तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण लघुउद्योग या शिवाय स्टार्टअप सुरू करण्याकरिता MSME द्वारे कर्ज उद्योजकांना पुरवले जाते.

कर्जाकरिता अर्जदाराची प्रोफाइल बघून त्याच्याच आधारावर व्याजदर निश्चित केला जातो. यासोबतच इतर महत्त्वाच्या बाबी देखील विचारात घेतल्या जातात. तर मित्रांनो सर्वात प्रथम उद्योग कर्ज घेण्याकरिता अर्ज कसा करावा? व त्याचा लाभ कसा घ्यावा? याबद्दल माहिती आपण सविस्तरपणे आजच्या लेखांमध्ये बघूया. कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या शेतकरी व इतर नागरिक मित्रांपर्यंत शेअर करावा.

MSME Loan लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा

1) मित्रांनो यासाठी सर्वात प्रथम एमएसएमइ च्या अधिकृत राष्ट्रीय संकेतस्थळावरती भेट देऊन नोंदणी करायचे आहे. नोंदणीसाठी Udyogaadhaar.gov.in हे राष्ट्रीय संकेतस्थळ आहे.

2) त्यानंतर त्यामध्ये मित्रांनो नोंदणी झाल्यानंतर उद्योजकाचे नाव. उद्योजकाचे आधार कार्ड क्रमांक या सोबतच इतर संबंधित माहिती प्रविष्ट करून ओटीपी जनरेट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

3) ओटीपी जनरेट केल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांक वरती पाठवलेला ओटीपी त्या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि नंतर व्हॅलिडेट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

4) यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचा अर्ज दिसेल त्यामध्ये तुम्हाला आवश्यक लागणाऱ्या सर्व तपशील भराव्या लागतील.

5) मित्रांनो अर्जामध्ये संपूर्ण आवश्यक तपशील भरला की सबमिट या पर्यायावर क्लिक करा.

6) सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही भरलेल्या सर्व डेटा योग्य आहे का तो एकदा तपासून घ्या व पुष्टी करण्याकरिता ओके बटनवर क्लिक करा.

7) मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांक वरती आणखी एक ओटीपी मिळेल जो ओटीपी तुमच्या आधार कार्ड शी लिंक असणार आहे.

8) ओटीपी इंटर केले की सबमिट या बटणावर क्लिक करा. व फायनल सबमिट ह्या बटणावरती क्लिक करून अर्ज सबमिट करा.

9) त्या ठिकाणी आता तुम्हाला नोंदणी क्रमांक दाखवला जाईल तो नोंदणी क्रमांक पुढील कामासाठी तुमच्याकडे सुरक्षित ठेवायचा आहे.

एमएसएमई कर्जाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. सर्वात प्रथम अर्जाची प्रत लागणार आहे
  2. ओळखीच्या पुराव्या करिता मतदान कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन इत्यादी गोष्टी लागतील.
  3. पासपोर्ट भाडेपट्टा करार यासोबतच दूरध्वनी वीज बिल व्यापारी परवाना रेशन कार्ड व निवासी पुरावा अशी प्रमाणपत्रे लागतील.
  4. वयाच्या पुराव्या करिता मतदान ओळखपत्र हायस्कूलची मार्कशीट पॅन कार्ड फोटो इत्यादी गोष्टी लागतील.
  5. यासोबतच मागील बारा महिन्यांचे बँक स्टेटमेंट लागणार आहे.
  6. व्यवसाय नोंदणीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  7. पॅन कार्डची झेरॉक्स आवश्यक आहे.
  8. कंपनीचे पॅन कार्ड असेल तर त्याची झेरॉक्स आवश्यक आहे.
  9. जुना व्यवसाय असेल तर मागील दोन वर्षाच्या झालेल्या नफ्या किंवा तोट्याची ताळबंदी लागेल.
  10. विक्री कराचा दस्ताऐवज.
  11. यासोबतच शहर कर दस्ताऐवज.

ही आवश्यक कागदपत्रे अर्ज करण्याकरिता अर्ज सोबत लागणार आहेत.

या बँकांकडून नागरिकांना MSME कर्ज देतात

1) युनियन बँक ऑफ इंडिया
2) ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
3) बजाज फिनसर्व्ह
4) आयसीआयसीआय बँक
5) सेंट्रल बँक ऑफ इंडिया
6) अलाहाबाद बँक
7) एचडीएफसी बँक
8) स्टेट बँक ऑफ इंडिया

या बँकांद्वारे आपल्याला कर्ज मिळू शकते

MSME कर्ज संदर्भात महत्वाचे निर्णय

मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्या एक जून रोजी झालेल्या बैठकीत मध्ये सूक्ष्म उद्योग लघुउद्योग आणि मध्यम उद्योग या व्याख्येमध्ये बदल करण्याकरिता मंजूर दिली होती. या माध्यमातून मध्यम उद्योगांकरिता उलाढालीची जी काही मर्यादा आहे ती 250 कोटी रुपये पर्यंत करण्यात आले आहे. जेणेकरून उद्योजकांना त्यांच्या गरजेनुसार MSME कर्जाचा लाभ घेता येणार आहे.

Leave a Comment