ठाणे महानगरपालिका मध्ये पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

ठाणे महानगरपालिका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील रिक्त पदांकरीता सहा महिन्यांच्या कालावधीसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात येत आहे .तरी पात्र शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .जाहीरातीनुसार पदनिहाय तपशिल पुढीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव – परिचारिका

एकुण पदांची संख्या – 49 ( यापैकी अनुसूचित जातीसाठी – 6 , अनुसुचित जमाती – 3 , विमुक्त जाती ( अ ) – 2 , भटक्या जमाती ( ब  ) – 1 , भटक्या जमाती ( क )  – 2 , भटक्या जमाती ( ड ) – 1 , विशेष मागास प्रवर्ग – 1 , इतर मागास प्रवर्ग – 1 , इडब्फएस – 5 )

पात्रता / वयोमर्यादा – परिचारिका पदांसाठी उमेदवाराने बारावी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर नर्सिंग कौन्सिलची पदविका असणे आवश्यक आहे , किंवा बी .एस्सी नर्सिंग . त्याचबरोबर MSCIT / CCC  संगणक प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे . तसेच या पदांकरीता आवश्यक वयोमर्यादा खुल्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 38 वर्षे तर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 43 वर्षे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – सदर पदाकरीता कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नसुन थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .थेट मुलाखतीचे स्थळ – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह प्रशासकीय भवन सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाचखाडी , ठाणे .सदर पदांसाठी कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment