अग्निवीरांना राज्य शासनांच्या सरकारी / निमसरकारी कार्यालयांमध्ये समाविष्ट करुन घेणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.06 जानेवारी 2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , सैन्यदलामधून अग्निवीर म्हणून सेवा समाप्तीनंतर त्यांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करणे संदर्भात उपाय योजना सुचविणे करीता अभ्यासगट स्थापन करण्यात येत आहे .
सदर अभ्यासगटामध्ये कर्नल दिपक ठोंगे ( निवृत्त ) सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्या अध्यक्षतेखाली इतर 06 सदस्यांचे समावेश करण्यात आले आहेत . सदर समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे पाहु शकता .
01.सरकारी / निमसरकारी सेवेत विविध माध्यमातुन नोकरीच्या संधी उपलब्ध करण्याकरीता उपाय योजना सुचविणे .
02.खाजगी क्षेत्रांमध्ये नोकरी मिळविणे बाबत उपाय योजना सुचविणे .
03.स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरीता प्रशिक्षण तसेच अर्थसहाय्य इ. बाबत उपाय योजना सुचविणे .
देशामध्ये सध्या राज्यातील 2839 अग्निवीरांची पदभरती झाली आहे , त्यापैकी 25 टक्के अग्निवीरांची सेवा कायम करण्यात येणार आहेत , तर उर्वरित 75 टक्के अग्निवीरांना राज्यातील अग्निशमन दल , राज्य राखीव पोलिस दल , पोलिस दल इ. शासकीय सेवेत सामावून घेण्याचा सरकारचा मानस आहे .यामुळे सदर अभ्यासगटाची स्थापना करण्यात आलेली आहे .

- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..