महाराष्ट्र राज्य सरकारने मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहेन या योजनेच्या धर्तीवर लेक लाडकी ही योजना सुरु केली आहे . या योजना अंतर्गत मुलींना 98,000/- रुपये पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे .ह्या योजना साठी राज्य शासनांकडुन अर्थसंकल्पांमध्ये मोठा निर्णय घेतला असून या करीता आवश्यक निधींची तरतुद करण्यात आलेली आहे .
लाडकी लेक मी संतांची मजवरी कृपा बहुतांची –
राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना आता नव्या स्वरुपामध्ये राज्य शासनांकडुन सुरुवात करण्यात आलेली आहे . यापुढे पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक कुटंबामधील मुलींना या योजना अंतर्गत लाभ मिळणार आहे .मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याकरीता एकुण 98,000/- रुपये पर्यंत आर्थिक लाभ मिळणार आहे .
मुलीच्या जन्मानंतर मुलीला 5,000/- रुपये मिळेल तर मुलगी ज्या वेळी इयत्ता पहिलीत जाईल त्यावेळी 4,000/- रुपये मिळेल . इयत्ता सहावीत गेल्यास 6,000/- रुपये तर मुलगी इयत्ता अकरावीमध्ये गेल्यास 8,000/- रुपये मिळेल .
तर मुलीचे वय 18 वर्षे पुर्ण होईल त्यावेळी मुलीला 75,000/- रुपये मिळतील .असे एकुण मुलीला 98,000/- रुपये मिळणार आहेत .या योजनेमुळे मुलींना आर्थिक दृष्ट्या मोठी मदत होणार आहे .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026