नागपुर : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 33 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रतधारकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Metro Rail Corporation Limited , Nagapur Recruitment For various Post , Number of Post vacancy – 33 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सह मुख्य प्रकल्प व्यवस्थापक01
02.वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक05
03.वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक04
04.उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक01
05.उपमहाव्यवस्थापक03
06.व्यवस्थापक02
07.सहायक व्यवस्थापक11
08.वरिष्ठ विभाग अभियंता05
09.कार्यालय सहाय्यक01

पात्रता – वरील पद क्र.01 ते 08 साठी शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / स्थापत्य / टेलिकम्युनिकेशन /इलेक्ट्रानिक्स /दुरसंचार/ मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई / बी.टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर कार्यालय सहाय्यक पदाकरीता उमेदवार हा शासकीय मान्यता प्राप्त संस्था / विद्यापीठातून कोणत्याही शाखतुन पदवीधारक असणे आवश्यकआहे . तसेच वरील सर्व पदांकरीता अनुभव असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रतधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://recruitment.mahametro.org/?notification=7 या संकेतस्थळावर दि.23 मार्च 2023 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 400/- रुपये तर मागास प्रवर्गाकरीता व महिला उमेदवारांना 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment