महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये महसूल विभाग अंतर्गत , तलाठी व मंडळ अधिकारी पदांसाठी पदभरती जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे . तलाठी पदांच्या एकूण 4,122 तर मंडळ अधिकारी पदांच्या 512 जागेसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे .पद भरतीसाठी आवश्यक पात्रता ,वयोमर्यादा ,या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया ..
आवश्यक पात्रता : तलाठी पदाकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतून ,मान्यता प्राप्त असणारे कोणत्याही विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असून उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल 45 वर्ष असणे आवश्यक आहे .तसेच उमेदवार हा MSCIT / CCC संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
निवड प्रक्रिया : तलाठी व मंडळ अधिकारी पदाकरिता सरळ सेवा पद्धतीने पदभरती राबविण्यात येणार असून , 100 गुणांची ऑनलाईन पद्धतीने टीसीएस / आयबीपीएस कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे . लेखी परीक्षेमध्ये गुणानुक्रमे / आरक्षण निहाय उमेदवाराची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल .निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी करण्यात येवून अंतिम आदेश देण्यात येईल .
या संदर्भातील अधिकृत माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे . यामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये नोकरीची उत्तम संधी प्राप्त होणार आहे .
तलाठी पदासाठी आवश्यक कागदपत्रे
तलाठी पदाचा अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराकडे रहिवाशी दाखला , जातीचा दाखला ,विवाह नोंदणी प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास ) नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र ,दहावी /बारावी / पदवीचे गुणपत्रक तसेच पदवीचे प्रमाणपत्र , आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक आहेत .
- कर्नाटक बँकेत पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1000+ जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत फ्लाइंग , ग्राउंड ड्युटी करीता तब्बल 336 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 169 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !