महाराष्ट्र जिल्हा परिषदेमधील सर्व पदांवर सरळसेवा पद्धतीने 13,500 जागेसाठी महाभरती करीता नविन जाहीरात प्रसिद्ध ! अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून निर्गमित केलेल्या जिल्हा परिषद मेगाभरती वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आलेला आहे .राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या दि.15 नोव्हेंबर 2022 रोजी शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गातील सर्व संवर्गातील , यामध्ये वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून रिक्त पदे भरण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे .

जिल्हा परिषदांमधील गट क पदांच्या सर्व पदांची रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करुन जिल्हा परिषदांना त्‍यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत भरण्याबाबत सुधारित कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .महाराष्ट्रातील वर्ग क मधील सर्व ( यामध्ये वाहनचालक हे पदे वगळून ) रिक्त पदांच्या 80 टक्के पदांवर सरळसेवा पद्धतीने पदभरती करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे .

पदभरती जाहिरात पाहा

निवड प्रक्रिया – निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे , याकरीता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे .पदभरती करताना राज्य शासनाने घालुन दिलेले भरती नियमांचे काटेकोरपणे पालन पालन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

राज्य शासनांकडून निर्गमित करण्यात आलेल्य निर्णयान्वये पदभरती जाहीरात दि.01 ते 07 फेब्रुवारी दरम्यान प्रसिद्ध करण्यात येणार होती , परंतु काही कारणास्तव भरती प्रक्रिया करीता विलंब झालेला असून , याबाबतची अधिकृत्त जाहीरात लवकरच प्रसिद्ध केली जाईल

पदभरती जाहिरात पाहा

पदभरती प्रक्रिया बाबतचे वेळापत्रक बाबतचे शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

पदभरती शासन निर्णय

Leave a Comment