मुंबई उच्च न्यायालय मध्ये शिपाई / हमाल पदाकरिता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . सदर पदभरती प्रक्रियाचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे पाहूया..
मुंबई उच्च न्यायालय मध्ये सद्यस्थितीमध्ये 24 शिपाई/ हमाल पदाकरिता रिक्त जागा असून , पुढील दोन वर्षांमध्ये 109 जागा असे एकूण 133 जागा रिक्त होणार आहेत . सदर 133 व 32 प्रतीक्षा यादी करिता असे एकूण मिळून 160 उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे . यामध्ये दिव्यांगासाठी 4% म्हणजेच 05 पदे राखीव ठेवण्यात येणार आहेत .
आवश्यक पात्रता – शिपाई /हमाल पदाकरिता उमेदवार हा कमीत कमी इयत्ता सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेपर्यंत उमेदवाराची किमान वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे , तर कमाल वर्ष 38 वर्षापेक्षा अधिक असू नये . मागासवर्गीय उमेदवारांना 43 वर्षापर्यंत अर्ज सादर करता येईल , त्याचबरोबर न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयामध्ये विशेष सूट लागू असणार नाही .
वेतनश्रेणी – सदर शिपाई / हमाल पदाकरिता सातवा वेतन आयोगानुसार S- 1 मध्ये 15000/- रुपये ते 47,600/- रुपये या वेतनश्रेणी मध्ये वेतन अधिक , नियमाप्रमाणे इतर वेतन व भत्ते अदा करण्यात येईल .
जाहिरात व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर CLICK करा !
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .