महाराष्ट्र राज्य शासनाच्या वन विभागातील गट क संवर्गातील पदांकरीता पदभरती बाबत जाहीरात प्रसिद्ध झालेली आहे . सदर पदभरती प्रक्रिया ही सरळसेवा पद्धतीने राबविण्यात येणार असून , सदर पदभरती प्रक्रिया बाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वन विभागातील लेखापाल पदांकरीता सरळसेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्याबत जाहीरात महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या कडून जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .यामध्ये लेखापाल पदांच्या तब्बल 127 जागेवकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक पात्रता – लेखापाल पदाकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवीधारक असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे सर्व प्रवर्गातील उमदेवारांकरीता 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा ही 38 वर्षे तर मागासवर्गीय उमेदवारांकरीता 45 वर्षांपर्यत वयांमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे .
उमेदवार हा फक्त कोणत्याही एकाच वनवृत्तासाठी अर्ज सादर करु शकेल , यामध्ये राज्यातील 12 वनवृत्तांनुसार रिक्त पदे देण्यात आलेली आहेत .सदर पदनिहाय अर्ज सादर करणे आवश्यक आहे .सदर पदभरती प्रक्रिया बाबतची अधिकृत्त जाहीरात पुढील लिंकवर क्लिक करुन डाऊनलोड करु शकता .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026