महाराष्ट्र राज्यातीत जिल्हा परिषदांमधील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सुधारित आकृतीबंधातील स्थायी पदांची निश्चिती करणेबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांकडून पदभरती प्रक्रिया शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील सुधारित आकृतीबंधानूसार स्थायी पदे , रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पाणी पुरवठा विभागाच्या दि.10 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषेदतील ग्रामीण पाणीपुरवठा विभाग / उपविभागासाठी मंजुर असलेल्या एकूण 4,147 सुधारित आकृतीबंधातील सदर निर्णयामध्ये नमुद 2765 पदे स्थायी पदे म्हणून मंजूर करण्यात येत आहेत .
यामध्ये अभियंता , सहाय्यक भूवैज्ञानिक ,सहाय्यक लेखाधिकारी , आरेखक , कक्ष अधिकारी , सहाय्यक आवेदक , वरिष्ठ सहाय्यक ,यांत्रिकी , वायू संपिडक चालक , रिंगमन , कनिष्ठ सहाय्यक , जॅक हॅमर ड्रिमर , संगणक चालक , वाहन चालक , लिपिक अशा पदांच्या रिक्त जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .यामध्ये चतुर्थश्रेणी संवर्गातील पदे मृत संवर्ग म्हणून सदर शासन निर्णयान्वये घोषित करण्यात आलेले आहेत .
चतुर्थश्रेणी पदांमधील सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीने किंवा अन्य कोणत्याही कारणाने पद रिक्त झाल्यास , सदर पद हे व्यपगत होणार आहे , व त्या पदावर नियमित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करता येणार नाही असे सूचित करण्यात आलेले आहेत .
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 11127 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- जिल्हाधिकारी कार्यालय लातुर अंतर्गत शिपाई पदाच्या 29 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- दि कळवण मर्चंट्स ( व्यापारी ) सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !