महाराष्ट्र राज्यातीत जिल्हा परिषदांमधील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सुधारित आकृतीबंधातील स्थायी पदांची निश्चिती करणेबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांकडून पदभरती प्रक्रिया शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील सुधारित आकृतीबंधानूसार स्थायी पदे , रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पाणी पुरवठा विभागाच्या दि.10 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषेदतील ग्रामीण पाणीपुरवठा विभाग / उपविभागासाठी मंजुर असलेल्या एकूण 4,147 सुधारित आकृतीबंधातील सदर निर्णयामध्ये नमुद 2765 पदे स्थायी पदे म्हणून मंजूर करण्यात येत आहेत .
यामध्ये अभियंता , सहाय्यक भूवैज्ञानिक ,सहाय्यक लेखाधिकारी , आरेखक , कक्ष अधिकारी , सहाय्यक आवेदक , वरिष्ठ सहाय्यक ,यांत्रिकी , वायू संपिडक चालक , रिंगमन , कनिष्ठ सहाय्यक , जॅक हॅमर ड्रिमर , संगणक चालक , वाहन चालक , लिपिक अशा पदांच्या रिक्त जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .यामध्ये चतुर्थश्रेणी संवर्गातील पदे मृत संवर्ग म्हणून सदर शासन निर्णयान्वये घोषित करण्यात आलेले आहेत .
चतुर्थश्रेणी पदांमधील सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीने किंवा अन्य कोणत्याही कारणाने पद रिक्त झाल्यास , सदर पद हे व्यपगत होणार आहे , व त्या पदावर नियमित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करता येणार नाही असे सूचित करण्यात आलेले आहेत .
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- GGMCJJH : सर जे.जे समूह रुग्णालय मुंबई अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर व शिपाई पदांसाठी पदभरती !
- माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ रायगड अंतर्गत प्राध्यापक , ग्रंथालय लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर , तंत्रज्ञ , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 63 रिक्त जागेसाठी पदभरती !
- BIS : भारतीय मानक ब्यूरो अंतर्गत 160 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !