महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये तब्बल 4 हजार 147 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात संदर्भात पाणी पुरवठा विभागांकडून पदभरती शासन निर्णय दि.10 एप्रिल 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर पदभरती निर्णयानुसार सुधारित आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात आलेला आहे . या सुधारित आकृतीबंधानुसार काही पदे हे नव्याने निर्माण करण्यात आलेली आहेत तर चतुर्थश्रेणी संवर्गातील पदे हे मृतसंवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत .मृत संवर्गामध्ये जॅक हॅकर ड्रिलर , संगणक चालक व वाहन चालक हे पदे मृत पदे म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत .त्याचबरोबर चतुर्थश्रणी मधील सर्वच एकुण 717 पदे मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत .
ग्रामीण पाणीपुरवठा विभागांमध्ये जुन्या आकृतीबंधानुसार एकुण 4,022 पदे मंजुर होते आता यामध्ये काही पदे वाढविण्यात आलेले असून , सुधारित आकृतीबंधानुसार एकुण 4,147 पदांस राज्य शासनांकडून मंजुरी देण्यात आलेली आहे .यापैकी 2765 पदे हे स्थायी पदे तर 1,382 पदे अस्थायी पदे म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत .
यापैकी रिक्त असणाऱ्या पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे , यामध्ये अभियंता ,भुवैज्ञानकि , लेखाधिकारी , कक्ष अधिकारी , आरेखक ,सहाय्यक आवेदक , वरिष्ठ सहाय्यक , वरिष्ठ सहाय्यक लेखा , यांत्रिकी , रिंगमन , कनिष्ठ सहाय्यक या पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .
जिल्हानुसार रिक्त पदांची संख्या पाहण्यासाठी खालील सविस्तर पदभरती शासन निर्णय डाऊनलोड करा .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026