मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ मध्ये स्वयंपाकी या पदाकरिता पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ,पदांचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे पाहूया ..
स्वयंपाकी या पदाकरिता उमेदवार हा इयत्ता चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर सदर उमेदवाराला मराठी, हिंदी भाषा लिहिता ,वाचता ,बोलता येणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 38 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे , मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येईल .
गुणदान पद्धती : उमेदवारांची निवड करताना , गुण दान पद्धती प्रक्रिया मध्ये , स्वयंपाकाचे प्रात्यक्षिक परीक्षा याकरिता 30 गुण , शारीरिक कार्यक्षमता चाचणी याकरिता 10 गुण तोंडी मुलाखत याकरिता 10 गुण असे एकूण 50 गुणांची छाणणी परीक्षा घेण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिराती मध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज प्रबंधक मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद येथील खंडपीठ जालना रोड औरंगाबाद या पत्त्यावर दिनांक 2 मे 2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे . सदर पद भरती प्रक्रिया करिता उमेदवारांकडून 200 रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 111 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MahaTransco : महा – पारेषण कंपनी अंतर्गत अभियंता , व्यवस्थापक , लिपिक (कनिष्ठ/ वरीष्ठ ) इ. पदांच्या 493 जागेसाठी महाभरती .
- लातुर जिल्हा बालविकास योजना ( नगर परिषद निलंगा / अहमदपुर , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती !
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !