तुम्ही जर बारावी उत्तीर्ण असाल व सरकारी नोकरीच्या शोध घेत असाल तर आपल्यासाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे . सचिवालय विभागांमध्ये 12 वी पात्रताधाकांसाठी तब्बल 1 हजार 600 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधाक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .पदनाम , पदांसाठी आवश्यक अर्हता , अर्ज प्रक्रिया या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सचिवालय विभागांमध्ये कनिष्ठ लिपिक ( Lower Division Clerk ) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक ( JSA ) , डेटा एंन्ट्री ऑपरेटर , डेटा एंन्ट्री ऑपरेटर (ग्रेड A ) अशा पदांच्या एकुण 1600 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Staff Selection Commison Combined Higher Secondary Level Examination for Junior Clerk / JSA , Data Entry Operator )
आवश्यक शैक्षणिक अर्हता : वरील सर्व पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त मंडळातील इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर वरील सर्व पदांकरीता उमेदवाराचे वय हे दि.01.08.2023 रोजी 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . ( यांमध्ये SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना वयांमध्ये पाच तर OBC प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
हे पण वाचा : राज्यातील अनुदानित / खाजगी शाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मेगाभर्ती !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : वरील पदांकरीता अर्ज करण्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी आपले आवेदन https://ssc.nic.in/ या वेबसाईटवर दिनांक .08 जून 2023 रोजी रात्री 11.00 PM पर्यंत सादर करायचे आहेत . या भरतीकरीता ओपन / ओबीसी उमेदवारांकडून 100/- रुपये तर राखाव प्रवर्गा करीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026