राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये विविध पदांच्या तब्बल 89 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत . पदांचे नाव , पदसंख्या, आवश्यक शैक्षणिक पात्रता यासंबंधी सविस्तर पदभरती जाहिरात पुढील प्रमाणे पाहूयात..
पदनाम / पदांची संख्या : यामध्ये कनिष्ठ अधिकारी (विधी ) पदाच्या 04 जागा , कनिष्ठ अधिकारी ( विजीलेंस ) पदांच्या 02 जागा , मॅनेजमेंट ट्रेनि ( मार्केटिंग ) पदांच्या 15 जागा , मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) पदांच्या 01 जागा , मॅनेजमेंट ट्रेनी ( सिव्हील ) पदांच्या 01 जागा , ट्रेनी (कृषी) पदांच्या 40 जागा, पट्रेनी (मार्केटिंग ) पदांच्या 06 जागा , ट्रेनी (कॉलिटी कंट्रोल) पदांच्या 03 जागा , ट्रेनी (स्टेनोग्राफर) पदांच्या 05 जागा , ट्रेनी (ॲग्री स्टोअर्स ) पदांच्या 12 जागा अशा एकूण 89 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात आहे .
आवश्यक शैक्षणिक पात्रता : वरील पदांकरिता पदानुसार संबंधित क्षेत्रातील पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : वरील पदांकरिता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 30 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षाची तर इतर मागासवर्गीय उमेदवारांकरिता वयामध्ये तीन वर्षांची सूट देण्यात येणार आहे .
हे पण वाचा : राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मध्ये 802 जागेसाठी महाभरती , Apply Now !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिराती मध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज https://www.indiaseeds.com/current-career या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 25 सप्टेंबर 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पद भरती प्रक्रिया करिता 500/- रुपये आवेदन आकारले जाणार आहेत , तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता कोणत्याही प्रकारची फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !