महाराष्ट्र राज्य माजी सैनिक सहयोग मंडळ मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे .( Maharashtra Servicemen Corporation Limited Recruitment For Driver Post , Number of Post Vacancy – 60 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता , इतर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये वाहनचालक या पदांच्या एकुण 60 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे माजी सैनिक अथवा माजी सैनिकांचे पाल्य असणे आवश्यक असणार आहेत , तसेच जड व हलके वाहन चालविण्याचा त्याचबरोबर वाहन परवाना असणे आवश्यक असणार आहे .
वयोमर्यादा : सदर पदाकरीता आवेदन सादर करण्यासाठी माजी सैनिक उमेदवारांसाठी 55 वर्षे पर्यंत तर माजी सैनिकांच्या पाल्यांकरीता कमाल वयोमर्यादा ही 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता मेस्को क्षेत्रीय कार्यालय पुणे मस्तानी हॉल शेजारी युद्ध स्मारकासमोर घोरपडी पुणे – 411001 या पत्त्यावर हजर रहायचे आहेत .तसेच सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क / परीक्षा शुक्ल आकारले जाणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदांच्या 358 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .