राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मध्ये 802 जागेसाठी महाभरती , Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ मध्ये गट अ ,ब ,क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 802 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवली जात असून , आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहे . पदनाम ,पदांची संख्या ,आवश्यक पात्रता इत्यादी संदर्भातील परिपूर्ण माहिती पुढील प्रमाणे पाहूया ..

पदनाम / पदांची संख्या : यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य) पदांच्या एकूण 03 जागा ,उप अभियंता ( स्थापत्य) पदांच्या 13 जागा , उप अभियंता (विद्युत /यांत्रिकी) पदांच्या 03 जागा, सहयोगी रचनाकार पदांच्या 02 जागा , उपरचनाकार पदांच्या 02 जागा , उपमुख्यलेखा अधिकारी पदांच्या 02 जागा ,सहाय्यक अभियंता (स्थापत्य ) पदांच्या 107 जागा , सहाय्यक अभियंता ( विद्युत )पदांच्या 21 जागा , सहाय्यक रचनाकार पदांच्या 07 जागा , सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ पदांच्या 02 जागा , लेखा अधिकारी पदांच्या 03 जागा.

क्षेत्र व्यवस्थापक पदांच्या 08 जागा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या 17 जागा ,कनिष्ठ अभियंता (विद्युत /यांत्रिकी) पदांच्या 02 जागा , लघुलेखक उच्च श्रेणी पदांच्या 14 जागा , लघुलेखक निम्म श्रेणी पदांच्या 20 जागा , लघुटंकलेखक पदांच्या 07 जागा, सहाय्यक पदांच्या 03 जागा, लिपिक पदांच्या 16 जागा, वरिष्ठ लेखापाल पदांच्या 06 जागा ,तांत्रिक सहाय्यक पदांच्या 32 जागा, वीजतंत्री पदांच्या 18 जागा , पंपचालक पदांच्या 103 जागा , जोडारी पदांच्या 34 जागा , सहाय्यक आरेखक पदांच्या 09 जागा अनुरेखक पदांच्या 49 जागा

हे पण वाचा : बियाणे महामंडळ मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया लगेच करा आवेदन !

गाळणी निरीक्षक पदांच्या 02 जागा भूमापक पदांच्या 26 जागा विभागीय अग्निशमन अधिकारी पदांच्या 01 जागा , सहाय्यक अग्निशमन अधिकारी पदांच्या 08 जागा ,कनिष्ठ संचार अधिकारी पदांच्या 02 जागा , वीजतंत्री पदांच्या 01 जागा , यंत्र चालक पदांच्या 22 जागा , अग्निशमन विमोचक पदांच्या 187 जागा अशा एकूण 802 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे ..

पदांचे नाव, पदसंख्या व सातव्या वेतन आयोगानुसार पदनिहाय वेतनश्रेणी या संदर्भात सविस्तर चार्ट खालील प्रमाणे आहे ..

ऑनलाईन अर्ज / जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे ..

जाहिरात पाहा / अर्ज करा

Leave a Comment