भारतीय स्टेट बँकेत तब्बल 6,160 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State Bank of India Recruitment For Various Post Number of Post Vacancy – 6160 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुया .
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये बँकिंग अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) पदांच्या एकुण 6,160 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यापैकी महाराष्ट्र राज्यात एकुण 466 जागा आहेत .
संवर्ग निहाय पदांची संख्या :
| संवर्ग | पदांची संख्या |
| SC | 989 |
| ST | 514 |
| OBC | 1389 |
| EWS | 603` |
| UR | 2665 |
| TOTAL | 6160 |
आवश्यक अर्हता / वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , त्याचबरोबर उमेदवाराचे दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी किमान वय हे 20 वर्षे ते 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 5 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 3 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/sbiaaug23/ या संकेतस्थळावर दिनांक 21 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग करीता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- महावितरण बारामती अंतर्गत 99 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- संयुक्त वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध पदाच्या तब्बल 1358 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 405 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 245 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SBI BANK : भारतीय स्टेट बँकेमध्ये 116 रिक्त जागेसाठी आत्ताची नवीन पदभरती !