SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 6,160 जागांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय स्टेट बँकेत तब्बल 6,160 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State Bank of India Recruitment For Various Post Number of Post Vacancy – 6160 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुया .

पदनाम / पदांची संख्या :  यांमध्ये बँकिंग अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) पदांच्या एकुण 6,160 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यापैकी महाराष्ट्र राज्यात एकुण 466 जागा आहेत .

संवर्ग निहाय पदांची संख्या :

संवर्गपदांची संख्या
SC989
ST514
OBC1389
EWS603`
UR2665
TOTAL6160

आवश्यक अर्हता / वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , त्याचबरोबर उमेदवाराचे दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी किमान वय हे 20 वर्षे ते 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 5 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 3 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .

हे पण वाचा : राज्यात आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 340 जागांसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/sbiaaug23/  या संकेतस्थळावर दिनांक 21 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग करीता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment