HDFC बँक परिवर्तन ECS शिष्यवृत्ती योजना , पहिली ते पदव्युत्तर पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे प्रयोजन ! अर्ज प्रक्रिया प्रक्रिया सुरु .

Spread the love

HDFC बँक ही भारतातील खाजगी क्षेत्रामध्ये सर्वात मोठी बँक असुन , सामाजिक बांधिलकी म्हणुन बँकेमार्फत विविध सामाजिक योजना / उपक्रम राबविण्यात येते .देशातील गुणवंत व गरिब होतकरु विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य व्हावे तसेच त्यांना उच्च शिक्षणासाठी मदत व्हावी याकरीता HDFC बँकेमार्फत इयत्ता 1 ली ते पदव्युत्तर पदवी शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे 15,000/- रुपये ते 35,000/- रुपये शिष्यवृत्ती दिली जाते .या संदर्भातील सविस्तर शिष्यवृत्ती योजना विषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणुन घेवूयात .

या शिष्यवृत्ती योजनाचा फायदा घेण्यासाठी आवश्यक पात्रता –

  1. HDFC बँक परिवर्तनची ECS शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी ,विद्यार्थी हा इयत्ता 1 ली ते पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये शिकत असले पाहिजेत.
  2. विद्यार्थी हा शासकिय , खाजगी ,सरकारी अनुदानित शाळेत शिक्षण घेत असला पाहीजे .
  3. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक .
  4. विद्यार्थी हा भारतीय नागरिक असणे अत्यावश्यक आहे .
  5. विद्यार्थ्यांना मागील इयत्तेमध्ये / दहावी / बारावी /पदवी अभ्यासक्रमांमध्ये 55% गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक .

शिष्यवृत्तीचे आर्थिक स्वरुप –

इयत्ता 1 ली ते 6 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना रुपये 15,000/- शिष्यवृत्ती दिली जाते .तर इयत्ता 7 वी ते 12 मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना रुपये 18,000/- दिले जाते .तर डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी 20,000/- रुपये तर पदवी अभ्यासक्रमांसाठी 30,000/-  रुपये शिष्यवृत्ती लाभ देण्यात येते . तर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी 35,000/- रुपये शिष्यवृत्ती लाभ देण्यात येते .

अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक कागतपत्रे –

अर्ज सादर करण्याठी विद्यार्थ्याला मागील इयत्तेमधील गुणपत्रक , ओळखपत्र , उत्पन्नाचा दाखला, त्याचबरोबर चालु वर्षातील शाळेचा / महाविद्यालयाचा बोनाफाईट जोडणे आवश्यक .कौटुंबिक / वैयक्तिक संकटाचा पुरावा ( लागु असल्यास ) जोडावे .

अर्ज करण्याची प्रक्रिया –

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी https://www.buddy4study.com/page/hdfc-bank-parivartans-ecs-scholarship या लिंकवर क्लिक करुन सविस्तर माहिती भरुन अर्ज सादर करु शकता .ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक -15.10.2022 आहे .

Leave a Comment