रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Railtel Corporation Of India Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 81 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक व्यवस्थापक ( तांत्रिक ) | 26 |
| 02. | उपव्यवस्थापक ( तांत्रिक ) | 27 |
| 03. | उपव्यवस्थापक ( विपणन ) | 15 |
| 04. | सहाय्यक व्यवस्थापक ( वित्त ) | 06 |
| 05. | सहाय्यक व्यवस्थापक ( एचआर ) | 07 |
| एकुण पदांची संख्या | 81 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा तसेच अनुभव असणे आवश्यक असणार आहेत , तसेच कमाल वयोमर्यादा 21 वर्षे तर कमाल वयोमर्यादा ही 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : यांमध्ये उमेदवार हे बी. ई / बी.टेक / बी.एस्सी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन तसेच संगणक विज्ञान / आयटी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अथवा एमसीए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 ते 05 पदांसाठी : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये एमबीए उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वयोमर्यादा ही 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे या संकेतस्थळावर दिनांक 11 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 1200/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग करीता 600/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 275 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध गट ब, क व ड संवर्गातील एकुण 175 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत गट अ व ब संवर्गातील 139 जागेसाठी पदभरती !
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- धुळे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .