RCFL : राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये तब्बल 408 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालाधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rashtriya Chemicals And Fertilizers Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 408 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.पदवीधर अप्रेंटिस : पदवीधर अप्रेंटिस पदांमध्ये अकाउंट्स एक्झिक्युटिव पदांच्या 51 जागा , सेक्रेटेरियल असिस्टंट पदांच्या 76 जागा , तर सेक्रेटेरियल असिस्टंट ( HR ) पदांच्या 30 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे बी.कॉम / बी बी ए / पदवीधर असणे आवश्यक असणार आहेत .
02.टेक्निशियन अप्रेंटिस : टेक्निशियन अप्रेंटिस पदांमध्ये केमिकल पदांच्या 30 जागा , सिव्हिल पदांच्या 11 जागा , कॉम्प्युटर पदांच्या 06 जागा , इलेक्ट्रिकल पदांच्या 20 जागा , इन्स्टुमेंटेशन पदांच्या 20 जागा तर मेकॅनिकल पदांच्या 28 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . सदर पदांकरीता उमेदवार हे केमिकल / कॉम्प्युटर / इलेक्ट्रिकल / सिव्हिल / इन्स्टुमेंटेशन / मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये तब्बल 1,720 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
03.ट्रेड अप्रेंटिस : ट्रेड अप्रेंटिस पदांमध्ये अटेंडेंट ऑपरेटर पदांच्या 104 जागा , बॉयलर अटेंडंट पदांच्या 03 जागा , इलेक्ट्रिशियन पदांच्या 04 जागा , हॉर्टिकल्चर असिस्टंट पदांच्या 06 जागा , इन्स्टुमेंट मेकॅनिक पदांच्या 03 जागा , तर लॅब असिस्टंट ( केमिकल प्लांट ) पदांच्य 13 जागा तर मेडिकल लॅब टेक्निशियन ( पॅथॉलॉजी ) पदांच्या 03 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सदर पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी / 10 वी परीक्षा उत्तीर्ण / 12 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01 एप्रिल 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल , तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ors.rcfltd.com/3054/Position/APTREC-2023/ORS/ या संकेतस्थळावर दिनांक 07 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- श्री.संत गजानन शिक्षण महाविद्यालय बीड अंतर्गत , प्राचार्य , सहायक प्राध्यापक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- IITM Pune : भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- सैनिकी शाळा भुसावळ , जळगाव अंतर्गत शिक्षक , आया , हाऊस बॉय , शिपाई , सुरक्षा रक्षक , वेल्डर , सुतार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- कर्नाटक बँकेत पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1000+ जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत फ्लाइंग , ग्राउंड ड्युटी करीता तब्बल 336 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !