BDL : भारत डायनेमिक्स मध्ये विविध पदांच्या तब्बल 361 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारत डायनेमिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 361 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bharat Dynamics Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 361 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रकल्प अभियंता / अधिकारी136
02.प्रकल्प डिप्लोमा सहाय्यक / सहाय्यक142
03.प्रकल्प ट्रेड सहाय्यक / कार्यालय सहाय्यक83
 एकुण पदांची संख्या361

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअरिंग / एम.ई /एम.टेक अथवा एमबीए /एमएसडब्ल्यु / पी.जी डिप्लोमा/ सोशल वर्क / सी.ए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी महारोजगार मेळावा , 405+ जागांसाठी महाभरती !

पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इंजिनिअरिंग डिप्लोमा अथवा वाणिज्य / व्यवसाय प्रशासनातील पदवी अभ्यासक्रम अथवा सी.ए / ICWA /CS / अथवा 01 वर्षाचा डिप्लोमासह विज्ञान / अर्थशास्त्रातील पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.03 साठी : उमेदवार हे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत किंवा DCCP /DCP कोर्स अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत.

वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://onlinereg.co.in/senareg24/Home.aspx#no-back-button या संकेतस्थळावर दिनांक 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता पद क्र.01 करीता 300/- खुला / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता तर पद क्र.02 व 03 करीता खुला / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल . मागास प्रवर्ग / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment