महाराष्ट्र राज्य पोलिस विभागांमध्ये तब्ल 17,471 पोलिसांची महाभरती प्रक्रिया करणेबाबत गृह विभागांकडून मान्यता देण्यात आलेली असून , सदर पदांवर लवकरच पदभरती करण्यात येणार आहेत . गृह विभागांकडून सन 2022 व सन 2023 या वर्षातील दिनांक 31.12.2023 अखेर पर्यंत शिपाई संवर्गातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देणेबाबत , तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा OMR पद्धतीने अथवा ऑनलाईन पद्धतीने पोलिस घटकस्तरावर घेण्यास मान्यता देणेबाबत , गृह विभागांकडून दिनांक 31 जानेवारी 2024 रेाजी अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
यांमध्ये सन 2022 व सन 2023 या वर्षातील ( दिनांक 31.12.2023 अखेर पर्यंत ) राज्यातील पोलिस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवारी शिपाई संवर्गातील पोलिस शिपाई , बॅण्डसमन , पोलिस शिपाई ,चालक , सशस्त्र पोलिस शिपाई , कारागृह शिपाई अशा पदांच्या एकुण 17,471 इतक्या पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .
पोलिस शिपाई घटकांतील या पदांसाठी होणार महाभरती : 01 ) पोलिस शिपाई , 02 ) बॅण्डस्मन , 03) पोलिस शिपाई चालक , 4 ) सशस्त्र पोलिस शिपाई 5 ) कारागृह शिपाई अशा एकुण 17,474 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .
हे पण वाचा : गट अ , ब आणि क संवर्गातील पदांसाठी मोठी पदभरती !
सदरची रिक्त पदांवर 100 टक्के क्षमतेने भरण्यास वित्त विभागाच्या दिनांक 30.09.2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींमधून सुट देण्यात येत आहेत . सदरची पदभरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्विकृती , छाननी व तत्सम कामाकरीता बाह्य सेवापुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अपर पोलिस महासंचालक , प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात येत आहेत .

या संदर्भातील गृह विभागांकडून दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर पदभरती शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026