महाराष्ट्र राज्य पोलिस विभागांमध्ये तब्बल 17,471 पोलिसांची महाभरती होणार , गृह विभागांकडून पदभरती शासन निर्णय निर्गमित !

Spread the love

महाराष्ट्र राज्य पोलिस विभागांमध्ये तब्ल 17,471 पोलिसांची महाभरती प्रक्रिया करणेबाबत गृह विभागांकडून मान्यता देण्यात आलेली असून , सदर पदांवर लवकरच पदभरती करण्यात येणार आहेत . गृह विभागांकडून सन 2022 व सन 2023 या वर्षातील दिनांक 31.12.2023 अखेर पर्यंत शिपाई संवर्गातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देणेबाबत , तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा OMR पद्धतीने अथवा ऑनलाईन पद्धतीने पोलिस घटकस्तरावर घेण्यास मान्यता देणेबाबत , गृह विभागांकडून दिनांक 31 जानेवारी 2024 रेाजी अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

यांमध्ये सन 2022 व सन 2023 या वर्षातील ( दिनांक 31.12.2023 अखेर पर्यंत ) राज्यातील पोलिस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवारी शिपाई संवर्गातील पोलिस शिपाई , बॅण्डसमन , पोलिस शिपाई ,चालक , सशस्त्र पोलिस शिपाई , कारागृह  शिपाई अशा पदांच्या एकुण 17,471 इतक्या पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .

पोलिस शिपाई घटकांतील या पदांसाठी होणार महाभरती : 01 ) पोलिस शिपाई  , 02 ) बॅण्डस्मन , 03) पोलिस शिपाई चालक , 4 ) सशस्त्र पोलिस शिपाई 5 ) कारागृह शिपाई अशा एकुण 17,474 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .

हे पण वाचा : गट अ , ब आणि क संवर्गातील पदांसाठी मोठी पदभरती !

सदरची रिक्त पदांवर 100 टक्के क्षमतेने भरण्यास वित्त विभागाच्या दिनांक 30.09.2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींमधून सुट देण्यात येत आहेत . सदरची पदभरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्विकृती , छाननी व तत्सम कामाकरीता बाह्य सेवापुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अपर पोलिस महासंचालक , प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात येत आहेत .

या संदर्भातील गृह विभागांकडून दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर पदभरती शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

Leave a Comment