महाराष्ट्र राज्य शासन सेवेत शिक्षक पदांच्या तब्बल 21,678 जागांसाठी महाभरती प्रक्रीया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम देण्यास आज दिनांक 06 फेब्रुवारी 2024 पासून सुरुवात झालेली आहे . ( Pavitra Portal Teacher Mahabharati , Number of Post Vacancy – 21,678 ) सविस्तर महाभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये प्राथमिक शिक्षक / माध्यमिक शिक्षक / उच्च माध्यमिक शिक्षक पदांच्या एकुण 21,678 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . (Pavitra Portal Teacher Mahabharati , Number of Post Vacancy – 21,678 )
व्यवस्थापनाचे नावे : यांमध्ये शिक्षक भरती ही राज्यातील जिल्हा परिषद , नगरपरिषदा , महानगरपालिका ( Without Interview ) , तसेच राज्यातील खाजगी अनुदानित शाळा – महाविद्यालय (With Interview ) व्यवस्थापनेतील रिक्त शिक्षक पदांवर महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : भारतीय नौदल मध्ये मोठी पदभरती !
आवश्यक अर्हता (Education Qualification) :
01.प्राथमिक शिक्षक : सदर पदांकरीता उमेदवार हे 12 वी , डी.एड अर्हता तसेच टी.ई.टी / टेट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
02.माध्यमिक शिक्षक : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित पदवी , डी.एड , बी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
03.उच्च माध्यमिक शिक्षक : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी तसेच बी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया : पवित्र पोर्टलवर आवेदन सादर केलेल्या उमेदवारांनी पसंतीक्रम देण्यासाठी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx या संकेतस्थळावर भेट द्यायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी व्यवस्थानानुसार जाहीरात पाहण्यासाठी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx या संकेतस्थळावर डाऊनलोड या ऑप्शनवर क्लिक करुन With Interview आणि Without Interview या ऑप्शनवर क्लिक करुन जाहीरात डाऊनलोड करु शकता ..
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , चालक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !