राज्य शासन सेवेत तब्बल 21,678 जागांसाठी महाभरती , आवेदन सादर करण्यास सुरुवात ..

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत शिक्षक पदांच्या तब्बल 21,678 जागांसाठी महाभरती प्रक्रीया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम देण्यास आज दिनांक 06 फेब्रुवारी 2024 पासून सुरुवात झालेली आहे . ( Pavitra Portal Teacher Mahabharati , Number of Post Vacancy – 21,678 ) सविस्तर महाभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये प्राथमिक शिक्षक / माध्यमिक शिक्षक / उच्च माध्यमिक शिक्षक पदांच्या एकुण 21,678 जागांसाठी महाभरती प्रक्रिया  राबविण्यात येत आहेत . (Pavitra Portal Teacher Mahabharati , Number of Post Vacancy – 21,678 )

व्यवस्थापनाचे नावे : यांमध्ये शिक्षक भरती ही राज्यातील जिल्हा परिषद , नगरपरिषदा , महानगरपालिका ( Without Interview ) , तसेच राज्यातील खाजगी अनुदानित शाळा – महाविद्यालय  (With Interview ) व्यवस्थापनेतील रिक्त शिक्षक पदांवर महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : भारतीय नौदल मध्ये मोठी पदभरती !

आवश्यक अर्हता (Education Qualification) :

01.प्राथमिक शिक्षक : सदर पदांकरीता उमेदवार हे 12 वी , डी.एड अर्हता तसेच टी.ई.टी / टेट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

02.माध्यमिक शिक्षक : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित पदवी , डी.एड , बी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

03.उच्च माध्यमिक शिक्षक : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी तसेच बी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया : पवित्र पोर्टलवर आवेदन सादर केलेल्या उमेदवारांनी पसंतीक्रम देण्यासाठी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx या संकेतस्थळावर भेट द्यायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी व्यवस्थानानुसार जाहीरात पाहण्यासाठी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx या संकेतस्थळावर डाऊनलोड या ऑप्शनवर क्लिक करुन With Interview आणि Without Interview या ऑप्शनवर क्लिक करुन जाहीरात डाऊनलोड करु शकता ..

Leave a Comment