भारतीय रेल्व मध्ये सरळसेवा पद्धतीने ग्रेड I आणि ग्रेड III पदांच्या 9,144 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Railways Department Recruitment For Technician Post , Number of Post Vacancy -9,144 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.टेक्निशियन ( Technician Grade -I Signal ) ग्रेड I सिग्नल : सदर पदांच्या एकुण 1092 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी / बी.टेक / डीप्लोमा इन फिजिक्स / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर / आयटी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01 जुलै 2024 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 36 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
02. टेक्निशियन ( Technician Grade -III ) ग्रेड III : सदर पदांच्या एकुण 8,052 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी ( SSC ) + संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण किंवा 12 वी विज्ञान शाखेतुन PCM विषयास उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01 जुलै 2024 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 33 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
वेतनमान ( Pay Scale ) :
| पदनाम | पे लेव्हल 7 th CPC | Basic Pay |
| टेक्निशियन ग्रेड I सिग्नल | लेव्हल – 5 | 29,200 |
| टेक्निशियन ग्रेड III | लेव्हल – 2 | 19,900 |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing या संकेतस्थळावर दिनांक 08 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग , माजी सैनिक / महिला / आ.दु.घ प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026