कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मध्ये 323 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Employees Provident Fund Organisation Recruitment For Personal Assistant Post , Number of Post Vacancy – 323 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये पर्सनल असिस्टंट ( PA ) पदांच्या एकुण 323 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Personal Assistant Post , Number of Post Vacancy – 323 )
शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच स्टेनोग्राफी 10 मिनिटांमध्ये 120 श.प्र.मि ( हिंदी/ इंग्रजी , लिप्यंतरण / डिक्टेशन ) तसेच संगणकावर 50 मिनिटे ( इंग्रजी ) 65 मिनिटे हिंदी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 27 मार्च 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या संकेतस्थळावर दिनांक 27 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 25/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026