NHPC : सरकारच्या नॅशनल हायड्रो-इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांच्या 280 जागेसाठी मोठी पदभरती !

Spread the love

नॅशनल हायड्रो-इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिडेट मध्ये विविध पदांच्या 280 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Hydroelectric Power Corporation Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 280 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ट्रेनी इंजिनिअर ( सिव्हिल )95
02.ट्रेनी इंजिनिअर ( मेकॅनिकल )75
03.ट्रेनी इंजिनिअर ( इलेक्ट्रिकल )77
04.ट्रेनी इंजिनिअर ( E & C )04
05.ट्रेनी इंजिनिअर ( आयटी )20
06.ट्रेनी ऑफिसर (Geology)03
07.ट्रेनी इंजिनिअर / ट्रेनी ऑफिसर ( Environment )06
 एकुण पदांची संख्या280

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयामध्ये 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एसस्सी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : या सरकारी बँकेत 3,000 जागेसाठी महाभरती , पदवीधारकांस सुवर्णसंधी !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 26.03.2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग ( SC / ST ) प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्‍क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://intranet.nhpc.in/RecruitApp/ या संकेतस्थळावर दिनांक 26 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी व आ.दु.घ प्रवर्ग करीता 708/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता कोणतीही फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment