BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 517 जागेसाठी महाभरती 2024 ; अर्ज करायला विसरुन नका !

Spread the love

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 517 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bharat Electronics Limited Recruitment For Trainee Engneer Post , Number of Post Vacancy – 517 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

दनाम /  पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये ट्रेनि इंजिनिअर पदांच्या 517 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , संवर्गनिहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहेत .

संवर्गपदांची संख्या
खुला210
ओबीसी139
आ.दु.घ52
अनुसुचित जाती77
अनुसुचित जमाती39
एकुण पदसंख्या517

हे पण वाचा : कार्यालय सहाय्यक , चालक , स्वयंपाकी , सुरक्षा रक्षक , तांत्रिक सहाय्यक इ. पदांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.ई / बी.टेक / एम ई / एम टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) ; सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01.02.2024 रोजी बी.ई / बी.टेक अर्हताधारकांसाठी कमाल वयोमर्यादा ही 28 वर्षे तर एम.ई / एम.टेक अर्हता धारकांसाठी कमाल वयोमर्यादा ही 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://docs.google.com/forms/ या संकेतस्थळावर दिनांक 13 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 150/- रुपये 18 टक्के जीएसटी परीक्षा शुल्क आकारण्यात येईल तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment