बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये तब्बल 1178 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत . पदांची नाव , आवश्यक पात्रता ,पदांची संख्या याबाबत सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशील पुढील प्रमाणे पाहूयात..
पदनाम / पदसंख्या : यामध्ये कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे पदनाम कनिष्ठ लिपिक ) या पदासाठी एकूण 1178 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा किंवा समकक्ष शैक्षणिक अहर्ता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी धारण करणे आवश्यक असणार आहे .
त्याचबरोबर उमेदवार हा इयत्ता दहावी मध्ये 100 गुणांची मराठी व 100 गुणांची इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर उमेदवार हा इंग्रजी व मराठी मध्ये टंकलेखन किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : पंजाब नॅशनल बँक मध्ये मोठी भरती , Apply Now !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिराती मध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/bmc या संकेतस्थळावर दिनांक 16 जून 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करिता 1000/- रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता 900/- रुपये आवेदन शुल्क / परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !