शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर व विचारांवर चालणाऱ्या शिंदे गटाला आता शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले आहेत .भारतीय निवडणुक आयोगाने याबाबत मोठा निर्णय दिलेला असून , शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाला मिळालेला नसुन शिंदे गटाला देण्यात आलेला आहे .
भारतीय निवडणुक आयोगाने याबाबत निर्णय देत सांगितले कि , ठाकरे गटाने निवडणुक होण्यापूर्वीच पदाधिकाऱ्यांची निवड करणे हे अयोग्य आहे . त्यामुळे शिवसेना या चिन्हावर निवडलेल्या उमेदवारांना शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह वापरण्याचा अधिकार शिंदे गटाला देण्यात आलेला आहे .
शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह मागिल पोटनिवडणुकींमध्ये गोठविण्यात आले होते , परंतु आता शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल करण्यात आले आहे .यामुळे ठाकरे गटांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . परंतु ठाकरे गटाने सर्वाच्च न्यायालयामध्ये केस दाखल केलेली असून याबाबत सुनावणी अद्याप बाकी आहे . हा निर्णय भारतीय निवडणुक आयोगाकडून देण्यात आलेला आहे .
आता ठाकरे गटाची आशा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागलेली आहे .निवडणुक आयोगाच्या निर्णयावर शिंदे गटाकडुन तसेच भारतीय जनता पार्टीकडुन आनंद व्यक्त करण्यात येत आहेत .यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना सांगितले कि , बाळासाहेबांचा विचार व शिवसैनिक ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे शिवसेना आली आहे .
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !