राज्य शासनाने निर्गमित केलेल्या निर्णयान्वये राज्यातील महानगरपालिकांमध्ये 22,831 जागेसाठी पदभरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे . कोरोना महामारीच्या काळांमध्ये मुंबई महानगरपालिकेतील तब्बल 10 हजार जागांसाठी पदभरतीसाठी राज्य शासनाकडून सहमती मिळालेली आहे .यापैकी काही पदांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे .
यामध्ये मुंबई पालिका अंतर्गत अग्निशमन विभागाकडून अग्निशमन जवान पदांच्या 910 जागांसाठी पदभरती सुरु करण्यात आलेली आहे .तसेच उर्वरित 9 हजार पदांमध्ये कनिष्ठ लिपिक पदांच्या सर्वात जास्त 1100 पदे रिक्त आहेत .यामुळे पालिका प्रशासनामध्ये कनिष्ठ लिपिक पदांचे पदे प्रथम प्राध्यान्याने भरण्यात येणार आहेत . त्याचबरोबर पालिका प्रशासनातील शिक्षक , सुरक्षा रक्षक , अभियंता , शिपाई तसेच सफाई कामगार अशा पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
सदर महाभरती प्रक्रिया राबविण्याकरीता पालिका प्रशासनांकडून परिपत्रक काढून मंदावलेली पदभरती प्रक्रिया सुरळीत करण्याचा निर्णय घेतला आहे .याकरीता शासनाच्या अध्यादेशानुसार भरती करीता कंपनी एजन्सीसोबत करार , अटी / शर्ती यासारख्या बाबी पुर्ण करण्याचे कामकाज पालिका प्रशासनांकडून करण्यात येत आहेत .
सदर पदभरती प्रक्रिया बाबतची अधकिृत्त जाहीरात ही 15 मार्च पर्यात निर्गमित करण्यात येईल , व ऑनलाईन परिक्षेचे आयोजन मार्च महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येणार आहे .उमेदवारांनी भरती प्रक्रिये करीता आवश्यक कागतपत्रे , इतर आवश्यक बाबींची पुर्तता करुन घेणे आवश्यक आहे .
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 378 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 118 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .