BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 558 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 558 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bharat Sanchar Nigam Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 558  ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये Senior Executive (Trainee ) पदांच्या 558 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून यांमध्ये टेलिकॉम ऑपरेशन पदांच्या 450 जागा , वित्त पदांच्या 84 जागा तर सिव्हिल पदांच्या 13 जागा तर इलेक्ट्रिकल पदांच्या 11 जागा असे एकुण 558 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . कार्यात्मक विभागानीनुसार पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.टेलिकॉम ऑपरेशन450
02.वित्त ( Finance )84
03.सिव्हिल13
04.इलेक्ट्रिकल11
 एकुण पदांची संख्या558

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये कमीत कमी 60 टक्के गुणांसह अभियंता पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : राज्यात विविध पदांसाठी महाभरती मेळावा, लगेच करा आवेदन !

पद क्र.02 साठी : उमेदवार हे सी.ए / कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकौंटसी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे सिव्हिल अभियंता पदवी किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.04 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इलेक्ट्रिकल अभियंता पदवी किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत तर यांमध्ये मागास / इतर मागास प्रवर्ग करीता नियमानुसार वयांमध्ये सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे www.bsnl.co.in या संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत , अर्ज सादर करण्याची व शेवटची दिनांक लवकरच जाहीर करण्यात येतील .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment