केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल ( CISF : Central Industrial Security Force ) मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 787 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( central industrial security force recruitment for constable / tradesman post , number of post vacancy – 787 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदांचे नाव – कॉन्स्टेबल ( स्वयंपाकी , कॉबलर , टेलर , बार्बर , वॉशर मॅन , स्वीपर , पेंटर , प्लंबर , माठी , वेल्डर )
एकुण पदांची संख्या – 787
पात्रता / वयोमर्यादा – उमेदवार इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.01.08.2022 रोजी किमान वय 18 वर्षे व कमाल वय 23 वर्षे असणे आवश्यक आहे . मागासप्रवर्गातील उमेदवारांकरीता 5 वर्षे तर इतर मागासप्रवर्ग उमेदवारांकरीता वयांमध्ये 3 वर्षे सुट देण्यात आली आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.20.12.2022 पर्यंत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या www.cisfrectt.in या संकेतस्थळावर दि.21.11.2022 पासुन अर्ज सादर करु शकता .अर्ज सादर करताना 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे . मागास प्रवर्ग व माजी सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MDA Royal इंटरनॅशनल स्कुल लातुरअंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती ..
- BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट ब व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी हवाई सेवा अंतर्गत 142 जागेसाठी पदभरती ; 22530/- रुपये मिळेल वेतनमान .
- माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- राज्य शासन सेवेत वर्ग – 4 ( परिचर , शिपाई , मदतनीस इ.) पदांच्या नियमित पदावर मोठी पदभरती..