आपण जर पदवीधारक असाल तर , लिपिक पदांच्या 4000+ जागेसाठी मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .सदर पदाकरिता इच्छुक पदवीधारक उमेदवार विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन करू शकणार आहेत.
केंद्र शासनाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या बँक ऑफ बडोदा , कॅनरा बँक , इंडियन ओव्हरसीज बँक , इको बँक ,बँक ऑफ इंडिया ,सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक ,युनियन बँक ऑफ इंडिया ,बँक ऑफ महाराष्ट्र ,इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये लिपिक पदासाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे .
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदर लिपिक पदाकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधारक असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर उमेदवारास संगणक साक्षरता प्रणालीचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे . याकरिता उमेदवार प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक असणार आहे .
वयोमर्यादा : सदर पदाकरिता अर्ज सादर करण्याकरिता उमेदवाराचे दिनांक 01 जुलै 2023 रोजी किमान 20 वर्ष पूर्ण असणे आवश्यक असेल , तर कमाल वयोमर्यादा 28 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .
अर्ज प्रक्रिया /आवेदन शुल्क : सदर जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली लिपिक पदाकरिता शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/या संकेतस्थळावर दिनांक 21 जुलै 2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत .अर्ज सादर करण्याकरिता उमेदवाराकडून 850/- रुपये परीक्षा शुल्क तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी / माजी सैनिक उमेदवारांसाठी 175/- रुपये शुल्क आकारली जाणार आहे .
माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !