महाभरती : तब्बल 17,000 जागेसाठी सरकारी नोकरीची सर्वात मोठी सुवर्णसंधी!

Spread the love

इयत्ता बारावी / दहावी पात्रताधारक उमेदवारांकरिता तब्बल 17,000 जागेसाठी सर्वात मोठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून , या संदर्भात केंद्र शासनाच्या गृह विभागाकडून अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे . ज्यामुळे देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना तब्बल 17,000 जागेवर हक्काची सरकारी नोकरी प्राप्त होणार आहे .

केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार , देशामध्ये तब्बल 17 राखीव बटालियन तयार करण्यात येणार आहे . जे की छत्तीसगड ,झारखंड ,उडीसा ,आणि जम्मू कश्मीर या भागामध्ये तैनात असणार आहेत . यामध्ये कॉन्स्टेबल आणि वर्ग-4 च्या पदाकरिता एकूण 17000 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत .

ही राखीव बटालियन केंद्रीय राखीव पोलीस दल याप्रमाणे कार्यरत असणार आहे .सदर पोलीस कॉन्स्टेबल या पदाकरिता उमेदवार हे इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर संवर्ग – ड मधील पदाकरिता उमेदवार हे इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरिता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय 25 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अंतर्गत पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन

पदांचे नावेकॉन्स्टेबल आणि संवर्ग – 4 मधील पदे
एकुण पदांची संख्या17,000
वेतनश्रेणी5200-20,200/-
आवश्यक शैक्षणिक पात्रताइ.10 वी / 12 वी पास
अधिकृत्त संकेतस्थळwww.police.gov.in

यामध्ये जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये एकूण पाच राखीव बटालियन तैनात असणार असून , यामध्ये एकूण 5000 जागा निश्चित करण्यात आले आहेत . त्याचबरोबर छत्तीसगड राज्यांमध्ये एकूण चार राखीव बटालियन तैनात करण्यात येणार असून , यामध्ये एकूण 4,000 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .

राज्याचे नावIRB ची संख्यापदांची संख्या
महाराष्ट्र022,000
उडिसा033,000
झारखंड033,000
छत्तीसगढ044,000
जम्मु आणि कश्मिर055,000
 एकुण पदसंख्या17,000

त्याचबरोबर झारखंड राज्यांमध्ये एकूण तीन राखीव बटालियन तैनात असणारा असून , यामध्ये 3,000 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत . ओरिसा राज्यामध्ये एकूण तीन राखीव बटालियन तैनात करण्यात येणार असून , यामध्ये एकूण तीन हजार पदांची पदभरती प्रक्रिया राबण्यात येणार आहेत . तर महाराष्ट्र राज्यात एकूण 02 बटालियन तैनात असणार असून, यामध्ये एकूण 2,000 जागेसाठी असे एकूण 17,000 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत .

या संदर्भात अधिकृत जाहिरात लवकरच निर्गमित होणार असून सविस्तर जाहिरात https://www.police.gov.in/ या संकेस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल .

Leave a Comment