महाराष्ट्र राज्य बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अंतर्गत पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन

Spread the love

महाराष्ट्र राज्य बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी )अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत .पदांचे नाव ,पदसंख्या, पदाकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर पद भरती तपशील पुढील प्रमाणे जाणून घेऊया …

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी ) जिल्हा नाशिक यांच्या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरती करण्यासाठी नगरपालिका/ नगरपरिषदा/ नगरपंचायत असलेल्या चांदवड ,देवळा ,दिंडोरी, सुरगाणा ,पेठ ,येवला ,निफाड, सिन्नर या शहरातील अंगणवाडी केंद्रातील मदतनिसांच्या रिक्त पदावर एकत्रित मानधन तत्त्वावर सरळ नियुक्तीने पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .

अंगणवाडी मदतनीस या पदांच्या एकूण 34 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हे इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदे ही महिलांसाठी राखीव असणार आहेत , तर उमेदवाराची किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 35 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : महाभरती : तब्बल 17,000 जागेसाठी सरकारी नोकरीची सर्वात मोठी सुवर्णसंधी !

अर्ज प्रक्रिया : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जिल्हा नाशिक यांचे कार्यालय सिल्वरमून फ्लॅट नंबर 01 ड्रीमसिटी जवळ ड्रीम कॉर्नर सहकारनगर रामदास स्वामी मार्ग नाशिक 42 200 06 या पत्त्यावर दिनांक 17 जुलै 2023 ते 28 जुलै 2023 या कालावधीमध्ये सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment