Dhule Kotwal : धुळे जिल्ह्यात फक्त 4 थी पास उमेदवारांसाठी कोतवाल पदाकरीता मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

जिल्हाधिकारी कार्यालय धुळे मध्ये फक्त 4 थी पास उमेदवारांसाठी कोतवाल या पदाकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Collector Office Dhule , Sub – Divisional Officer , Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 74 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या :  यांमध्ये कोतवाल या पदांच्या तब्बल 74 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , तर धुळे जिल्हातील उपविभागानुसार रिक्त कोतवाल पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.धुळे14
02.शिंदखेडा31
03.शिरपुर22
04.साक्री07
 एकुण पदांची संख्या74

हे पण वाचा : पोलीस पाटील पदांसाठी मोठी मेगाभरती 2023

आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 4 थी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवार हे स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा : उमेदवाराचे दिनांक 04.10.2023 रोजी किमान वय हे 18 ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://dhulekotwal.mahbharti.com/Default.aspx  या संकेतस्थळावर दिनांक 15 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment