धुळे जिल्हा प्रशासन मध्ये 4 थी / 10  वी पात्रता धारकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी , लगेच करा आवेदन !

Spread the love

धुळे जिल्हा प्रशासन मध्ये इयत्ता 4 थी / 10 वी अर्हताधारकांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Dhule Collector Office Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 2023 ) पदांचे नावे , पदसंख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर भरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये पोलिस पाटील या पदांच्या तब्बल 129 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे , जिल्हातील उपविभागनिहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.धुळे77
02.साक्री , शिरपुर , शिंदखेडा52
 एकुण पदांची संख्या129

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पोलिस पाटील या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी ( SSC ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत त्याचबरोबर उमेदवार हे स्थानिक रहीवाशी असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : 4 थी पास उमेदवारांसाठी कोतवाल पदाकरीता पदभरती !

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01.10.2023 किमान वय हे 25 वर्षे तर कमाल वय हे 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया /आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ppdhule.mahbharti.com/Default.aspx या संकेतस्थळावर दिनांक 15 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता खुला प्रवर्ग साठी 400/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment