अणु ऊर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनाय मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . (DPSDAE : Government of India Department of Atomic Engergy Directorate of Purchase & Stores , Recruitment for Junior Purchase Assistant / Junior Storekeeper , Number of Post Vacacny – 65 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यामध्ये कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ स्टोअरकीपर पदांच्या एकुण 65 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हा विज्ञान शाखेत 60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा 60 टक्के गुणांसह वाणिज्य शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . अथवा शासन मान्य विद्यापीठाची मेकॅनिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स / संगणक विज्ञान मध्ये 60 गुणांसह डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे तर कमाल वयोमर्यादा 27 वर्षे असणे आवश्यक आहे . यामध्ये मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
वेतनमान – निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार 25,500/- ते 81,100/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा करण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://dpsdae.formflix.in/index.php या सेकेतस्थळावर दि.15.05.2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- युको बँकेत पदवीधारक उमेदवारांसाठी 250 रिक्त जागेवर पदभरती ; लगेच करा आवेदन !
- केंद्र सरकारच्या NALCO कंपनी अंतर्गत 518 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करण्यास मुदतवाढ !
- कृष्णा विश्व विद्यापीठ सातारा अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; अर्ज करायला विसरुन नका !
- राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; Apply Now !
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 400 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !